सहकारमंत्री सुभाष देशमुख यांना मोठा झटका !

सहकारमंत्री सुभाष देशमुख यांना मोठा झटका !

मुंबई – सहकारमंत्री सुभाष देशमुख यांना मोठा झटका बसला असून लोकमंगल मल्टिस्टेस्ट सहकारी संस्थेला दिलेले अनुदान रद्द करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. बोगस कागदपत्रांच्या आधारे लोकमंगलने 25 कोटी रुपयांचे अनुदान लाटले होते. त्यामुळे या संस्थेला दिलेले अनुदान रद्द करण्यात आले आहे. हे अनुदान बोगस कागदपत्रांच्या आधारे लाटले असल्याचे चौकशीत उघड झाले आहे.

दरम्यान सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या लोकमंगल संस्थेने बोगस कागदपत्रांच्या आधारे दुध भुकटी कारखान्यासाठी 25 कोटी रुपये अनुदान लाटल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यापैकी 5 कोटी अनुदानाची रक्कम दूध भुकटी प्रकल्पासाठी मिळाली होती. परंतु ती रक्कम आता परत घेण्याबाबत दुग्ध विकास आयुक्तांना कारवाई करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत.

COMMENTS