साखर आयात करण्यावर सरकार ठाम !

साखर आयात करण्यावर सरकार ठाम !

अहमदनगर – सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी शनिवारी हिवरे बाजार गावाची भेट देऊन  गावाची पाहणी केली आहे. यावेळी त्यांनी सरकार साखर आयात करण्यावर ठाम असल्याचं म्हटलं आहे. साखरेचे भाव पाडण्यासाठी साखरेची आयात नाही तर भविष्यकाळात अडचणी येऊ नये म्हणून साखरेची आयात केली जाणार असल्याचं ते म्हणाले आहेत. तसेच साखर कारखानदार आणि ऊस उत्पादकांनी काळजी करू नये. ज्यावेळी अडचण येईल त्यावेळी सरकार मदत करणार असल्याचं आश्वासनही त्यांनी दिलं आहे.

यादरम्यान बोलत असताना त्यांनी हिवरे बाजार या गावाचं कौतुक केलं आहे. हिवरे बाजार  हे जगासाठी आदर्शगाव असून त्याचे अनुकरण ईतर गावातील सरपंचांनी करावे असंही सुभाष देशमुख यांनी म्हटलं आहे.

 

COMMENTS