दिल्ली – दक्षिणेतील सुपरस्टार रजनिकांत यांनी आपल्या राजकीय पक्षाची घोषणा केली आहे. ते लवकरच आपल्या पक्षाचं नावही जाहीर करणार आहेत. रजनिकांत यांच्या राजकीय प्रवेशामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. अनेक राजकीय नेत्यांनीही रजिनकांत यांचं अभिनंदन केलं. परंतु भाजपचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी मात्र रजनिकांत यांच्यावर खालच्या पातळीत टीका केली आहे. रजनिकांत हे अशिक्षित असून त्यांना फक्त माध्यमांनीच मोठं केलं असल्याची टीका त्यांनी केली आहे. तसेच तामिळनाडूची जनता चाणाक्ष असून, त्यांना हे सर्व लक्षात येईलच असेही स्वामी यांनी म्हटलं आहे.
He only announced he is entering politics, had no details or documents, he is illiterate. Its only media hype, people of Tamil Nadu are intelligent: Subramanian Swamy, BJP on #Rajinikanth pic.twitter.com/4dDZWLGxdd
— ANI (@ANI) December 31, 2017
दरम्यान, रजनिकांत यांनी स्वामी यांच्या टीकेकडे दुर्लक्ष केलं असून ‘सध्याचे राजकारणी लोकशाहीच्या नावाखाली पैसे आणि जमिनी बळकावत आहेत. हीच परिस्थिती बदलत तामिळनाडूच्या राजकीय व्यवस्थेत आपल्याला काही महत्त्वाचे बदल घडवून आणायचे आहेत असं त्यांनी म्हटलं आहे.
COMMENTS