नवी दिल्ली – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत असलेली युती तोडावी असा सल्ला राज्यसभेचे खासदार आणि भाजपचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी दिला आहे. महाराष्ट्रातील सध्याची स्थिती पाहता तिथे राष्ट्रपती शासन लावणे हाच एक मार्ग असल्याचे सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटलं आहे. कोरोनाला आळा घालण्यास उद्धव ठाकरे असमर्थ आहेत. अशावेळी राष्ट्रपती शासन लागू करणे हाच एकमेव पर्याय उरतो अन्यथा ते तुम्हाला कट रचल्याप्रमाणे उद्ध्वस्त करतील अशा आशयाचे ट्वीट सुब्रमण्यम स्वामी यांनी केले आहे.
दरम्यान महाराष्ट्रात कोरोनाबाधितांच्या मृत्यूचा आकडा वाढत असल्याने राष्ट्रपती राजवट लागू करावी, असा सल्ला स्वामी यांनी दिला आहे. भारतातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लाखाच्या पार गेली आहे. कोरोनाग्रस्तांपैकी 33 टक्के महाराष्ट्रातील, तर देशातील एकूण कोरोना रुग्णांपैकी 20 टक्के मुंबईत आहेत असंही सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटले आहे. त्यामुळे स्वामी यांच्या या वक्तव्याला महाविकास आघाडीचे नेते काय प्रत्युत्तर देणार हे पाहण गरजेचं आहे.
COMMENTS