ज्येष्ठ नेते सुधाकरपंत परिचारक यांचे कोरोनामुळे निधन !

ज्येष्ठ नेते सुधाकरपंत परिचारक यांचे कोरोनामुळे निधन !

पंढरपूर – राज्यासह देशभरात कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. कोरोनामुळे काही राजकीय नेत्यांचं निधन झालं आहे. पंढरपूरमधील दिग्गज नेते सुधाकरपंत परिचारक यांचंही काल कोरोनामुळे निधन झालं आहे. काल रात्री साडेअकराच्या सुमारास पुण्याच्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
वयाच्या 85 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली आहे. कोरोनाची लागण झाल्याने त्यांच्यावर गेल्या आठ दिवसांपासून उपचार सुरु होते.

दरम्यान दोन दिवसांपूर्वीच प्रितीश परिचारक यांनी भावनिक पोस्ट केली होती. गेली 50 वर्षे ज्यांचा आधार पूर्ण जिल्ह्याला होता त्यांना आज आपल्या प्रार्थनेच्या आधाराची गरज आहे, तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमकडून सर्वोत्तम उपचार चालू आहेत. वृद्धापकाळ, पूर्वीचे साखर आणि रक्तदाब यासारखे आजार आणि नव्याने उद्भवलेला COVID न्यूमोनिया यामुळे त्यांची ही कोरोनाची लढाई कठीण होत आहे. असं त्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर काल रात्री त्यांचं निधन झालं आहे.

सुधाकरपंत परिचारक यांनी 25 वर्ष महाराष्ट्र विधानसभेची आमदारकी भूषवली होती. परिचारक यांनी 2019 मध्येही शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार म्हणून पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली होती. मात्र राष्ट्रवादीचे उमेदवार भारत भालके यांच्याकडून त्यांचा पराभव झाला होता.

COMMENTS