मुंबई – शिवसेना आणि भाजप युती ही आधीपासून आहे. पदाच्या वितरणाचा वाद कुठेही नाही जागेच समसमान वाटप होईल यात काही शंका नाही. युतीच्या संदर्भातील धोरण हे अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांनी ठरवलय. अब की बार २२० के पार हा फाॅर्म्युला ठरला असून त्यानुसार काम होत असल्याचं वक्तव्य राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलं आहे. कोणाचा मंत्री आणि कोणाचा मुख्यमंत्री हा वाद नाही कोण काय होईल हे एकत्रीत बसुन ठरवणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी बैठक घेत आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीबाबत कार्यकर्त्यांना सूचना दिल्या आहेत. युतीच्या 220 जागांसाठी कार्यकर्ते पूर्ण क्षमतेनिशी काम करणार, असल्याचं मुनगंटीवार म्हणाले आहेत. त्यामुळे अब की बार २२० के पार हा फाॅर्म्युला ठरला असून त्यानुसार काम होत असल्याचं वक्तव्य सुधीर मुनगंटीवार यांनी केलं आहे.
COMMENTS