मुंबई – शिवसेना आणि भाजप पुढच्या निवडणुका एकत्रच लाढणार असल्याचा दावा सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत केला आहे. शिवसेनेच्या मुखपत्रात काय छापून येतं याकडे लक्ष देऊ नका पण पुढची निवडणूक सेना – भाजप एकत्र लढणार असल्याचं सुधीर मुनगंटीवार यांनी विरोधकांना उद्देशून म्हटलं आहे. उत्तरप्रदेशच्या पोटनिवडणुकीच्या निकालानंतर विरोधकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. काहींना मंत्री बनण्याची घाई झाली आहे असा टोलाही त्यावेळी मुनगंटीवार यांनी विरोधकांना लगावला आहे.
दरम्यान पुन्हा सत्ता आमचीच येणार असल्याचा विश्वास मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे. आमच्यात कितीही वाद झाले तरी आमचे आम्ही बघून घेऊ काँग्रेस -राष्ट्रवादी 1999 मध्ये असेच भांडले आणि नंतर एकत्र झाले होते. आता तुम्हाला एकमेकांची गरज असल्याने एकत्र आलात त्यामुळे आम्ही ही वेगळं न काढता एकत्र येऊ असा विश्वास मुनगंटीवार यांनी सभागृहात विरोधकांना प्रत्युत्तर देताना व्यक्त केला आहे. अर्थसंकल्पाच्या चर्चेला उतरत देत असतांना मुनगंटीवार यांनी विरोधकांवर उलट हल्ला चढवत त्यांना चागलंच सुनावलं असल्याचं पहावयास मिळालं आहे.
दरम्यान काही दिवसांपूर्वीच आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका स्वबळावर लढवण्याची घोषणा शिवसेनेनं केली आहे. त्यानंतर अनेक वेळा शिवसेनेनं भाजपवर जोरदार टीकास्त्र करत तोंडसुख घेतलं असल्याचं पहावयास मिळालं आहे. परंतु तरीही सुधीर मुनगंटीवार यांनी आगामी निवडणुकीत शिवसेना भाजप एकत्र येणार असल्याचा दावा सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. तसेच यापुढची सत्ता आमचीच येणार असल्याचंही मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे. त्यामुळे खरत शिवसेना-भाजप एकत्र येणार आहे का याबाबत सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.
COMMENTS