सोलापूर – जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसह शेतकरी संघटना ऊस दरासाठी आधिकच आक्रमक झाल्या आहेत. पंढरपुरात हे आंदोलन चिघळले असून आंदोलकांनी आज पहाटे कोरटी येथे एक एसटी फोडली. ऊसाला पहिली उचल 2700 रुपये देण्याच्या मागणीसाठी शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत.
सोलापूर जिल्ह्यात साखर कारखनादारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. त्यातच राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांचेदेखील जिल्ह्यात 2 साखर कारखाने आहेत. देशमुख यांनी ऊसाला 2525 रुपये भाव देण्याची घोषणा केली होती. मात्र, जिल्ह्यातील संघटना 2700 रुपये हमीभाव मिळावा या मागणीवर ठाम आहेत. या मागणीसाठी आक्रमक झालेल्या आंदोलकांनी ठिकठिकाणी ऊस वाहतुकीचे ट्रॅक्टर अडवून टायरमधील हवा सोडली. तर, कराडावरून उस्मानाबादला जाणाऱ्या एसटी कोरटी येथे अडवून प्रवाशांना खाली उतरवत एसटीची तोडफोड केली. तसेच, अनवली येथे गुरुवारी संध्याकाळी अनवली येथेही एका एसटीची व ट्रकची तोडफोड करण्यात आली होती. बैठकीत तोडगा न निघाल्यास आंदोलन आणखी पेटणार
ऊसदरावरून चिघळलेल्या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी आज दुपारी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक बोलावली आहे. यात तोडगा न निघाल्यास मात्र हे आंदोलन आणखी पेटण्याची शक्यता आहे.
COMMENTS