रोहित पवारांसोबतच्या मैत्रीवर काय म्हणाले सुजय विखे ?

रोहित पवारांसोबतच्या मैत्रीवर काय म्हणाले सुजय विखे ?

बीड – राष्ट्रवादीचे नेते रोहित पवारांसोबतच्या मैत्रीवर भाजपचे खासदार सुजय विखेंनी आज प्रथमच भाष्य केलं आहे. रोहित पवारांशी माझे चांगले मैत्रीचे संबंध आहेत. आम्ही चांगले मित्र आहोत, असं म्हणत मैत्री आणि राजकारण कधी एकत्र करणार नसल्याचं सुजय विखेंनी म्हटलं आहे.विधानसभेसाठी रोहित पवार कर्जतमधून निवडणूक लढवणार आहेत का नाही, मला माहीत नाही, पण भाजपाचा खासदार म्हणून  मी भाजपाचा प्रामाणिकपणे प्रचार करणार असल्याचं सुजय विखेंनी सांगितलं आहे.

तसेच रोहित पवारांनी माझ्या विरोधात प्रचार केला, त्याप्रमाणेच गरज पडल्यास मीही त्यांच्या विरोधात प्रचार करेन असं वक्तव्य सुजय विखेंनी केलं आहे. मैत्री वेगळी आणि राजकारण वेगळं आहे असंही यावेळी सुजय विखे म्हणाले.

तसेच पार्थ पवारांना निवडणुकीत पाडलं, आता रोहित पवारांनाही पराभूत करु, असे सुजय विखेंच्या नावाने अनेक मेसेज सोशल मीडियात वायरल झाले होते. मात्र कर्जतमधील कार्यक्रमात मी पवार कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या विरोधात एक शब्दही बोललो नाही. मीडियाने चुकीच्या बातम्या छापल्याचा दावाही सुजय विखे यांनी केला आहे. ते परळी येथे बोलत होते.

COMMENTS