नागपूर – सहावीच्या भूगोल विषयाच्या पुस्तकात गुजराती धडे छापल्याचा मुद्दा विधानपरिषदेत आज चांगलाच गाजला होता. हा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांनी समोर आणल्यानंतर हे पुस्तक सुनील तटकरे यांनी बाहेरून छापून आणलं सल्याची शंका चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली. त्यामुळे आक्रमक झालेल्या सुनील तटकरे यांनी मी सभागृहात विष घेऊन आत्महत्या करेन परंतु तसं कधी करणार नसल्याचं म्हटलं. त्यामुळे सभागृहात चांगलाच गोंधळ उडाला होता.
दरम्यान माझ्याकडे सहावीच्या भूगोलाचे पुस्तक असून त्यामध्ये कोणत्याही पानावर गुजराती भाषा नाही. तसेच हे पुस्तक जुनमध्ये छापण्यात आले आहे. सुनील टकरे यांना असे काही आढळले असेल तर त्यांनी हा मुद्दा अधिवेशनाच्या सुरुवातीलाच मांडायला हवा होता. परंतु त्यांनी तसं का केलं नाही असा सवाल यावेळी चंद्रकांत पाटील यांनी केला. यानंतर विरोधकांनी एकच गोंधळ करण्यास सुरुवात केली. तसेच महाराष्ट्राच्या अस्तमितेचा मुद्दा उचलून धरत राष्ट्रवादीच्या आमदारांनी सभागृहात चांगलाच गोंधळ केला होता. त्यामुळे सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं.
COMMENTS