नागपूर – राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आज नागपूरमध्ये सुरूवात झाली. बहुतेक आमदारांना अधिवेशन काही नवे नाही. मात्र पहिल्यांदाच आमदार झालेल्यांसाठी मात्र हा पहिलाच अनुभव होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि विधान परिषदेचे आमदार सुनिल तटकरे हे त्यांचे पुत्र अनिकेत तटकरे यांच्यासोबत एकत्र विधीमंडळात आले. यावेळी बोलताना तटकरे यांनी अभिमानाने माझे मन भरुन आले अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. ट्विट करुन त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
आज राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन #नागपूर येथे सुरू झाले. यावेळी माझे सुपुत्र, नवनिर्वाचित आमदार @ATatkare यांच्यासोबत विधानभवनात प्रवेश करताना मन अभिमानाने भरून आले. #MonsoonSession #नागपूर_अधिवेशन pic.twitter.com/pKZnUe6xwJ
— Sunil Tatkare (@SunilTatkare) July 4, 2018
नुकत्याच झालेल्या कोकण स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत अनिकेत तटकरे मोठ्या मताधिक्याने निवडूण आले आहेत. अनिकेत यांच्यासाठी हे पहिलेच अधिवेशन. विधान परिषदेत असलेल्या बापलेकांनी आज परिषदेत एकत्रित प्रवेश केला. तटकरे यांच्याशिवाय शिवसेनेच्या गोपीकिशन बजोरिया आणि त्यांचा मुलगा विप्लव बजोरिया यांच्यासाठीही आजचा दिवस तटकरे यांच्यासारखाच होता. तर नाशिकच्या दोन भावांसाठी तर हे पहिलेच अधिवेशन होते. नरेंद्र दराडे आणि किशोर दराडे या शिवसेनेच्या आमदारांसाठी दोघांसाठीही हे पहिलेच अधिवेशन.
COMMENTS