मुंबई – राज्यातील फडणवीस सरकारचं भवितव्य उद्या ठरणार आहे. कारण सुप्रीम कोर्टाने उद्या (बुधवार)बहुमत चाचणी घेण्याचे आदेश दिले आहेत. फडणवीस सरकारकडे बहुमत नसल्याचा आक्षेप घेत शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस या तीन पक्षांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. त्यावर आज सुप्रीम कोर्टानं निर्णय दिला आहे.
दरम्यान उद्या संध्याकाळी 5 वाजेपर्यंत बहुमत चाचणी घ्या. गुप्त मतदान नको. खुल्या पद्धतीने मतदान होणार. बहुमत चाचणीचं लाईव्ह रेकॉर्डिंग होणार असल्याचं सुप्रीम कोर्टानं म्हटलं आहे.
दरम्यान सुप्रीम कोर्टाच्या या निकालानंतर सत्यमेव जयते, भाजपचा खेळ संपला,’ असं ट्वीट राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केलं आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयावर राष्ट्रवादीच्या गोटात आनंद असल्याचं दिसत आहे. त्यामुळे फडणवीस सरकार बहुमत कसं सिद्ध करणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
COMMENTS