नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयानं मोठा निर्णय घेतला असून यापुढे निवडणुकीचे नामांकन दाखल करताना उमेदवाराला उत्पन्नाचे स्त्रोत सांगावे लागणार आहेत. आतायपर्यंत फक्त संपत्तीचे विवरण सांगितले जात होते परंतु यापुढे आता आपल्या उत्त्पन्नाचे स्त्रोत सांगणे बंधनकारक करण्यात आलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे निवडणूक नामांकन दाखल करताना उमेदवाराला पत्नी आणि कुटुंबियांचे उत्पन्न सांगावे लागणार आहे.
दरम्यान यामुळे निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता येईल, असे निवडणूक आयोगाचे म्हणणे होते. सरकारने निवडणूक आचारसंहितेमध्ये सुधारणा करत प्रतिज्ञापत्रात एका नव्या रकान्याचा समावेश केला आहे. यामध्ये उमेदवाराला आपला आणि आपल्या पत्नीच्या उत्पन्नाचा स्त्रोत द्यावा लागणार आहे. गतवर्षी योजना आयोगाने यासंबंधी कायदा मंत्रालयाशी संपर्कही साधला होता. यामुळे निवडणूक प्रक्रियेत आणखी पारदर्शकता येईल, असे निवडणूक आयोगाचे म्हणणे होते. यासंबंधी काही महिन्यांपूर्वी सर्वोच्च न्यायालयात एक प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले होते. त्यावर सर्वोच्च न्यायालयान आज निर्णय दिला आहे.
COMMENTS