मुंबई – गणेश नाईक यांना सुप्रीम कोर्टातही दणका बसला असून नवी मुंबईतील बावखळेश्वर मंदिराचे अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त करण्याचा आदेश सुप्रीम कोर्टानं दिला आहे. १५ फेब्रुवारीपर्यंत मंदिराचे अनधिकृत बांधकाम तोडण्याची मंदिर ट्रस्टने सुप्रीम कोर्टात ग्वाही दिली आहे तर ट्रस्टने स्वतःहून बांधकाम तोडले नाही, तर एमआयडीसीने पोलीस बळाची मदत घेऊन तोडण्याचा आदेश सुप्रीम कोर्टानं दिला आहे.नवी मुंबईतील बावखळेश्वर मंदिराचे अनधिकृत बांधकाम तोडण्याच्या मुंबई हायकोर्टाच्या आदेशाविरोधातले ट्रस्टचे सुप्रीम कोर्टात अपिल केलं होतं. परंतु सुप्रीम कोर्टानंही गणेश नाईक यांना दणका दिला असून हे बांधकाम पाडण्याचा आदेश दिला आहे.
COMMENTS