एससी-एसटी कर्मचा-यांना प्रमोशनमध्ये कायद्याप्रमाणे आरक्षण द्या – सर्वोच्च न्यायालय

एससी-एसटी कर्मचा-यांना प्रमोशनमध्ये कायद्याप्रमाणे आरक्षण द्या – सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली – केंद्र सरकार एससी,एसटी कर्मचा-यांना प्रमोशनमध्ये आरक्षण देऊ शकते असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला दिले आहेत. जोपर्यंत संविधान पीठ अंतिम निकाल देत नाही तोपर्यंत केंद्र सरकार एससी/एसटी कर्मचा-यांना कायद्याप्रमाणे प्रमोशनमध्ये आरक्षण देऊ शकते असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे.

दरम्यान सरकारतर्फे ॲटर्नी सांलिसिटर जनरल मनिंदर सिंग यांनी बाजू मांडली होती. यावेळी कर्मचा-यांना प्रमोशन देने सरकारची जबाबदारी आहे मात्र उच्च न्यायालयाच्या वेगवेगळ्या निकालामुळे प्रमोशन थांबले असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. यावर सर्वोच्च न्यायालयानं सरकार कायद्याप्रमाणे प्रमोशनमध्ये आरक्षण देऊ शकते असं म्हटलं आहे. त्यामुळे केंद्र सरकारमधील एससी-एसटी कर्मचा-यांना प्रमोशनमध्ये आरक्षण दिलं जाणार असल्याचं दिसून येत आहे. या प्रमोशनाबाबत उच्च न्यायालयांच्या विविध निकालांमुळे हे प्रमोश थांबवण्यात आलं होत. परंतु आता एस-एसटी कर्मचा-यांना प्रमोशनमध्ये आरक्षण देण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याचं दिसत आहे.

 

COMMENTS