देशातील सर्व राजकीय पक्षांना सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण आदेश!

देशातील सर्व राजकीय पक्षांना सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण आदेश!

नवी दिल्ली – देशभरातील सर्व राजकीय पक्षांना सुप्रीम कोर्टानं महत्त्वपूर्ण आदेश दिला आहे. निवडणूक बॉण्ड्सच्या माध्यमांतून मिळणाऱ्या देणग्यांची माहिती ३० मे पर्यंत निवडणूक आयोगाला देण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. यामध्ये राजकीय पक्षांनी त्यांना कोणाकडून किती रक्कम मिळाली या माहितीसह ज्या खात्यामध्ये ही रक्कम ठेवण्यात आली आहे, त्याची माहिती द्यायची आहे. निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता राखण्यासाठी हे गरजेचे असल्याचे मत सरन्यायाधीश गोगोई, न्या. दीपक गुप्ता आणि न्या. संजीव खन्ना यांच्या खंडपीठाने म्हटले आहे.

या निवडणूक बॉण्ड्सच्या वैधतेबाबत दाखल करण्यात आलेल्या एका जनहित याचिकेवरील सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टाने हे आदेश दिले आहेत.असोसिएशन ऑफ डेमोक्रेटिक रिफॉर्म्स नावाच्या एका स्वयंसेवी संस्थेने यासंदर्भात सुप्रीम कोर्टात जनहित याचिका दाखल केली आहे.

दरम्यान देशातील सर्व राजकीय पक्षांनी १५ मे पर्यंत मिळणाऱ्या देणग्यांची माहिती ३० मे पर्यंत एका बंद लिफाफ्यात निवडणूक आयोगाकडे सादर करावी असं कोर्टान म्हटलं आहे. सुप्रीम कोर्टाच्या या आदेशामुळे आता देशातील सर्व राजकीय पक्षांना देणग्यांची माहिती द्यावी लागणार आहे.

COMMENTS