महाशिवआघाडी’विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका !

महाशिवआघाडी’विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका !

नवी दिल्ली – निवडणूक नंतर इतर पक्षासोबत जाऊन सत्ता स्थापन करणे म्हणजे जनतेचा विश्वासघात असल्याचा आरोप करत प्रमोद जोशी यांनी महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यामध्ये त्यांनी निवडणुकीनंतर इतर पक्षासोबत जाऊन सत्ता स्थापन करता येणार नसल्याचं मुद्दा मांडला आहे. यामध्ये त्यांनी केंद्र सरकार, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीला प्रतिवादी केले आहे.

दरम्यान या पक्षांनी मतदारांचा विश्वास तोडला आहे. युतीला मते दिली असताना शिवसेना काँग्रेससोबत जाऊ शकत नाही. जनतेने बहुमत दिले आहे त्याचा सन्मान करत युतीनं सरकार स्थापन करावं.विरोधी विचारसरणी बरोबर सरकार स्थापन करू नये. निवडणूकीनंतर होणारी महाशिवआघाडी चुकीच्या आधारावर असून महाशिवआघाडी स्थापन करणं जनतेच्या बहुमताचा अपमान असल्याचं जोशी यांनी म्हटलं आहे.

दरम्यान जनतेने ज्यांना मतदान केले त्यांचा सन्मान व्हायला पाहीजे. काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न करतेय. पण हे चुकीचं आहे.ओला दुष्काळ प्रकरणी उपाययोजना करण्यासाठी सरकार स्थापन होणे गरजेचे.जनता होरपळतेय असंही याचिकाकर्ता जोशी यांनी म्हटलं आहे.

COMMENTS