नवी दिल्ली – राज्यसभेतील निवडणुकीबाबत सुप्रीम कोर्टानं महत्त्वपूर्ण निर्णय दिला असून राज्यसभेतील निवडणुकीदरम्यान ‘यापैकी कोणीही नाही’ म्हणजेच नोटाचा वापर करता येणार नसल्याचं सुप्रीम कोर्टानं म्हटलं आहे. ‘नोटा’चा वापर फक्त थेट निवडणुकांमध्येच करता येईल परंतु तो राज्यसभा निवडणुकीत करता येणार नसल्याचं कोर्टानं स्पष्ट केलं आहे.
दरम्यान गुजरातमधील काँग्रेस नेते शैलेश परमार यांनी सुप्रीम कोर्टात याबाबत याचिका दाखल केली होती. गेल्या वर्षी राज्यसभा निवडणुकीत मतदान यंत्रांवर नोटाचा पर्याय उपलब्ध करुन देण्यात आला होता. निवडणूक कायद्याचा हा भंग असल्याचा दावा करत काँग्रेसने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवरील सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टानं हा निर्णय दिला आहे. त्यामुळे यापुढे राज्यसभेतील निवडणुकीदरम्यान नोटाचा वापर करता येणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे.
COMMENTS