नवी दिल्ली – पुरुषांच्या छळा संदर्भातील याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. बलात्कार आणि लैंगिक अत्याचार विरोधी कायद्यांत लिंग भेद करू नये, अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली होती. कायदे करण्याचा अधिकार संसदेचा असून कायद्यात बदल करायचा असेल तर संसदेतूनच करा, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. महिलांच्या बाजूने असल्यामुळे पुरुषांचा छळ होत असून कायदे बदलण्याची मागणी याचिकेत करण्यात आली होती.
दरम्यान महिलांद्वारे पुरूषांचा छळ केला जातो. परंतू कायदे केवळ महिलांच्या बाजूने आहेत. अशी भूमिका याचिकाकर्त्याने सर्वोच्च न्यायालयासमोर मांडली होती. परंतु कायदे महिलांच्या रक्षणासाठी बनवले आहेत. जर पुरूषांना त्यात बदल करावेसे वाटत असेल तर ते काम संसदेचे आहे. सुप्रीम कोर्ट या प्रकरणात हस्तक्षेप करू शकत नाही असं न्यायालयानं स्पष्ट केलं आहे.
COMMENTS