दिल्ली – नगरपालिका, नगरपंचायत, महापालिका किंवा ग्रामपंचायत सदस्य यांच्यासाठी आज सुप्रिम कोर्टाने एक महत्वपूर्ण निकाल दिला आहे. त्यानुसार आता नगरसेवकाच्या मुलाने किंवा वडिलांनी जरी अनधिकृत बांधकाम किंवा अतिक्रमण केले तरी त्यांचे सदस्यत्व रद्द होणार आहे. यापूर्वी केवळ नगरसेवकाने अनधिकृत बांधकाम केल्यास किंवा अतिक्रमण केल्यास त्याचे नगरसेवकपद रद्द होत असे. आता यामध्ये नगरवेसाच्या कुटुंबातील व्यक्तींचाही समावेश करण्यात आला आहे.
तसाच नियम आता ग्रामपंचायत सदस्यांसाठी करण्यात आला आहे. कोणत्याही ग्रामपंचायत सदस्याने किंवा त्याच्या मुलाने किंवा वडिलांनी अनधिकृत बांधकाम केल्यास किंवा अतिक्रमण केल्यास त्याचे सदस्यत्व रद्द केले जाणार आहे. सुप्रमि कोर्टाने आज हा महत्वपूर्ण निकाल दिला आहे.
COMMENTS