दिल्ली – राष्ट्रवादी काँग्रेसच्या बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार प्रदान करण्यात आला. दिल्लीमधील फेम इंडिया या संस्थेयच्या वतीने हा पुरस्कार देण्यात येतो. केंद्रीय मंत्री हर्षवर्धन यांच्या हस्ते सुळे यांना पुरस्कार देण्यात आला. या कार्यक्रमाला अनेक केंद्रीय मंत्री उपस्थित होते. खासदार म्हणून मतदारसंघात केलेली कामे, संसदेत उपस्थित केलेले प्रश्न आणि त्यांची प्रभावी मांडणी या निकषावर हा पुरस्कार देण्यात येतो. संस्थेनं देशभारतील खासदारांचे सर्वेक्षण केले होते. त्यातून 25 खासदारांची निवड करण्यात आली होती. त्यातमध्ये सर्वाधिक प्रश्न विचारलेल्या सुप्रिया सुळे यांनी बाजी मारली.
माझा मतदारसंघ आणि राज्यातील जनतेचा विश्वास यांच्या बळावर संसदेत त्यांचे प्रश्न मांडता आले.हा सन्मान माझ्यापेक्षा माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या तमाम जनतेचा आहे. अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी पुरस्कार मिळाल्यानंतर दिली आहे.
'फेम इंडिया' या संस्थेतर्फे सर्वोत्कृष्ट संसदीय कार्यासाठी दिला जाणारा यंदाचा 'श्रेष्ठ सांसद अवार्ड' स्वीकारला. माझा मतदारसंघ आणि राज्यातील जनतेचा विश्वास यांच्या बळावर संसदेत त्यांचे प्रश्न मांडता आले.हा सन्मान माझ्यापेक्षा माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या तमाम जनतेचा आहे. धन्यवाद. pic.twitter.com/0uPopEr6Zg
— Supriya Sule (@supriya_sule) March 30, 2018
COMMENTS