झेपत नसेल तर राजीनामा द्या – सुप्रिया सुळे

झेपत नसेल तर राजीनामा द्या – सुप्रिया सुळे

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मराठा आरक्षणावर भाजपवर टीका केली आहे. तसेच त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. भाजपाच्या जाहीरनाम्यात मराठा आणि धनगर आरक्षणाचा विषय होता. परंतु सत्तेत आल्यानंतर मराठ्यांना आणि धनगरांना आरक्षण मिळालं नाही. कारण मुख्यमंत्र्यांना सत्तेत आल्यावर न्यायालय आठवतं , निवडणुकीच्या प्रचारात न्यायालय आठवलं नाही का असा सवाल सुळे यांनी केला आहे. तसंच गृहमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळणारे मुख्यमंत्रीच महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडण्यास जबाबदार आहेत असा आरोप करत झेपत नसेल तर राजीनामा द्या अशी मागणीही सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

दरम्यान महाराष्ट्र बंदनंतर आज मराठा समाजानं मुंबई बंदची हाक दिली आहे. मुंबईसह, नवी मुंबई आणि ठाण्यात बंदची हाक दिली असून आज काही ठिकाणी आंदोलकांनी लोकल अडवल्या होत्या. तर कल्याण आणि ठाण्यामध्ये बसवर दगडफेक करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईत देखील हे आंदोलन चिघळत असल्याचं दिसत आहे. यावरुन सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली आहे.

 

COMMENTS