आजचा दिवस माझ्यासाठी दुःखद, सुप्रियाताईंना गहिवरले !

आजचा दिवस माझ्यासाठी दुःखद, सुप्रियाताईंना गहिवरले !

अकोले – आजचा दिवस माझ्यासाठी अत्यंत दु:खद असल्याचं वक्तव्य राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं आहे. उत्तर महाराष्ट्रात हल्लाबोल यात्रेचा तिसरा टप्पा सुरु आहे. यादरम्यान अकोले येथील सभेत त्या बोलत होत्या. राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आर आर पाटील यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांनी तीन वर्षांपूर्वी याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आबांसारख्या नेत्याला गमावले. आबा मला मोठ्या भावाप्रमाणे होते त्यामुळे आजही आबांची आठवण येते. जड अंतःकरणाने आबा आपल्यात नाही हे स्वीकारावं लागत असल्याचं म्हटलं आहे.

 

https://twitter.com/NCPspeaks/status/964412248868380672

 

दरम्यान यावेळी बोलत असताना त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. तसेच अहमदनगर जिल्ह्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला तीन आमदार दिले आहेत. येत्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्येही सर्व जागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मिळाव्यात यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे असंही सुप्रिया सुळे यांनी अकोले येथील जनतेला म्हटलं आहे. यावेळी बोलत असताना त्यांनी दिवंगत नेते आर आर पाटील यांच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. आजचा दिवास माझ्यासाठी अत्यंत दुःखद असून आबा मला मोठ्या भावासारखे होते त्यामुळे आजही आबांची आठवण येते. जड अंतःकरणाने आबा आपल्यात नाही हे स्वीकारावं लागत असल्याचं त्यांनी त्यावेळी म्हटलं आहे.

 

COMMENTS