पुणे – दुध दरवाढीसाठी खासदार सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भर पावसात आंदोलन केलं आहे. यावेळी सुळे यांनी राजू शेट्टी यांच्या आंदोलनाला पाठिंबा असल्याचे सांगितले. राजू शेट्टी यांनी प्रती लिटरला केलेली पाच रुपये अनुदानाची मागणी योग्य असल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
शेतीला उत्तम जोडधंदा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दूधाकडे विद्यमान राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष झाले आहे.दुधाला योग्य दर देण्याबाबत हे सरकार गंभीर नाही.यामुळेच @NCPspeaksने पुण्यात आंदोलन केले.या माध्यमातून दूध उत्पादक शेतकऱ्यांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचविण्याचा आम्ही सर्वांनी प्रयत्न केला pic.twitter.com/1FFob2yZma
— Supriya Sule (@supriya_sule) July 16, 2018
दरम्यान गुजरात सरकारने दुध उत्पादक शेतक-यांना 300 कोटी रुपयांचे अनुदान जाहीर केले आहे. मग महाराष्ट्र सरकारला काय अडचण आहे. असा सवाल करत त्यांनी पाच रुपये अनुदान मिळालेच पाहीजे अशी मागणी सुळे यांनी केली आहे. दरम्यान एकीकडे सुप्रिया सुळे भर पावसात दुध दरासाठी आंदोलन करत आहेत तर याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही समर्थकांनी सहकारी आणि खाजगी दुध संघांनी दुध पुरवठा सुरु ठेवला आहे. सुळे यांनी देखील ही बाब मान्य केली आहे. त्यामुळे या आंदोलनाबाबत राष्ट्रवादीत संभ्रमाचं वातावरण असल्याचं दिसत आहे.
COMMENTS