राज्यांचे अधिकार काढून घेण्याचं पाप केंद्र सरकार करतय, पाहा कांजूरमार्गच्या जागेबाबत काय म्हणाल्या सुप्रिया सुळे!

राज्यांचे अधिकार काढून घेण्याचं पाप केंद्र सरकार करतय, पाहा कांजूरमार्गच्या जागेबाबत काय म्हणाल्या सुप्रिया सुळे!

मुंबई – मेट्रोच्या कारशेडवरुन केंद्र विरुद्ध राज्य सरकार आमनेसामने येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण मेट्रो कारशेडची कांजूरमार्गची जागा ही केंद्राची असल्याचा दावा केंद्र सरकारने केला आहे. नुकतंच केंद्राने याबाबत राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र पाठवलं असून कांजूरमार्गची जागा एमएमआरडीयला देण्याचा निर्णय रद्द करा. ही जागा मिठागराची आहे. आम्ही त्यावरील आमचा हक्क सोडलेला नाही असं म्हटलं आहे.

यावर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. धक्कादायक गोष्ट केंद्र सरकारकडून कळलीय. ती जमीन महाराष्ट्र सरकारची आहे. कुठल्याही कायद्याप्रमाणे ज्या राज्याची जमीन असते त्याचा त्यावर पहिला अधिकार असतो. केंद्र सरकार सातत्याने राज्याचे सगळे अधिकार काढून घेण्याचं काम करतंय.
त्यांच्या कृतीतून ते दिसतंय, हे दुर्दैवी आणि निंदाजनक आहे. भाजपचे नेते कोणत्या आधारावर टीका करतायत. जमीन महाराष्ट्राची आहे ती विकास कामासाठी वापरली जातेय
.या देशात केंद्र सरकार हळूहळू आणीबाणी आणतंय असं चित्र असल्याची टीकाही सुप्रिया सुळे यांनी केली आहे..

महाराष्ट्र हे सुसंस्कृत राज्य आहे. मंदिरांचे टाळे तोडण्याची भाषा मी कधीच ऐकलेली नाही. हे दुदैवी आहे, सत्ता नसल्यामुळे कदाचित त्यांना काहीच सूचत नाही, त्यामुळे कदाचित ते बिचारे असे वागत असतील. समतोल कदाचित बिघडला असावा अशी टीका सुप्रिया सुप्रिया सुळे यांनी केली आहे. तसेच लग्नाचे हॉल्स खुले करण्याची विनंती मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना केली आहे. टप्प्याटप्प्याने हॉल खुले करा. दिवाळीनंतर हॉल उघडा, पण त्याचे बुकींग घ्यायला आता परवानगी द्या. त्यामुळे बॅण्डवाले, कॅटरर्स यांना दिलासा मिळेल असही त्या म्हणाल्या आहेत.

दरम्यान यावर मंत्री नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ज्या पद्धतीने केंद्र सरकारकडून मुख्य सचिवांना पत्र देण्यात आलंय, ती जागा मिठागराची आहे आणि ती चुकीच्या पद्धतीने देण्यात आली आहे असं केंद्र सरकारचे म्हणणं आहे. केंद्र सरकारने 2002 साली मिठागराची अनेक जागा राज्य सरकारला हस्तांतरीत केल्या होत्या. आधी भाजपचे नेते म्हणत होते ही जागा राज्य सरकारची नाही तर खाजगी जमीन आहे, आता केंद्र सरकार म्हणतेय ही जागा आमची आहे. त्यामुळे भाजपला मेट्रोमध्ये अडथळा करायचा आहे का?, मेट्रोचे काम कसे थांबवायचे यासाठी भाजपकडून कटकारस्थान चालू आहे. तसेच याबाबत सर्व तपास करुन राज्य सरकार केंद्र सरकारला उत्तर देईल असंही मलिक यांनी म्हटलं आहे.

तसेच यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हा विषय राज्य सरकार हाताळत आहे. त्यामुळे यावर तेच प्रतिक्रिया व्यक्त करतील. राज्य सरकार त्यावर योग्यपद्धतीने काम करत असल्याचंही त्यांनी सांगितलं. भाजपचे नेते आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जी टीका केली होती त्यावर विचारलं असतानाही त्यांनी विषयाला बगल दिली. हा विषय सरकारचा आहे सरकार बोलेल असंही त्यांनी सांगितलं.

मेट्रो कारशेडला  कांजूरमार्गला  हलवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. भाजपने  राज्य सरकारच्या या निर्णयाला विरोध केला होता.  पण, आता या वादात केंद्र सरकारनेही उडी घेतली आहे. केंद्र सरकारने कांजूरमार्ग येथील मेट्रो कारशेडचे काम थांबवण्याचे आदेश दिले आहे. याबद्दल केंद्राने राज्याच्या मुख्य सचिवांना एक पत्र पाठवले आहे. कांजूरमार्गची जागा एमएमआरडीयला देण्याचा निर्णय रद्द करा. ही जागा मिठागराची आहे. आम्ही त्यावरील आमचा हक्क सोडलेला नाही असं केंद्रानं म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

 

 

राष्ट्रवादीच्या जनता दरबारमध्ये सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

COMMENTS