मुंबई – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांनी आज भाजपात प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशानंतर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी जोरदार टीका केली आहे. हर्षवर्धन पाटील यांनी केलेल्या आरोपात फारसं तथ्य नाही. भांडण झालं दिरासोबत आणि नवऱ्याला सोडून दिलं. हर्षवर्धन पाटलांचं भांडण राष्ट्रवादी काँग्रेसशी होतं मग त्यांनी काँग्रेस सोडण्याची गरज नव्हती. दिर कायतरी बोलला म्हणून आपण नवरा सोडत नाही, अशी बोचरी टीकाही त्यांनी हर्षवर्धन पाटलांवर केली आहे.
तसेच इंदापूरच्या जागेबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. हर्षवर्धन पाटलांनी चर्चा केल्याशिवाय पक्ष कसा काय सोडला, असा सवाल सुप्रिया सुळेंनी केला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये इंदापूरच्या जागेची चर्चा झालीच नव्हती. सीटींग असेल तर चर्चा तर झालीच पाहिजे ना, असंही सुळे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनीही हर्षवर्धन पाटील यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. तीन पिढ्या सरकारमध्ये असताना आणि मंत्रिपद देऊनही काही लोक पक्ष सोडून जात आहेत. अजित पवार एकदा दिलेला शब्द पाळतो. मग कितीही किंमत मोजावी लागली तरी तो पाळतो. हर्षवर्धन पाटील खोटे आरोप करत आहेत. पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो मान्य असेल असा शब्द दिला होता,’ असा खुलासा अजित पवार यांनी केला आहे.
COMMENTS