मुंबई – अयोध्येतील राम मंदिराच्या मुद्द्यावरुन पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावर टीका केली आहे. मंदिर-मसजिद विवाद सुप्रीम कोर्टात प्रलंबित असताना सरसंघचालक कायदा आणण्याची भाषा करतात, राज्यातील सत्ताधाऱ्यांचे भागीदारही त्याची री ओढतात. हा न्यायप्रक्रियेवर अविश्वास नाही का? जो काही निकाल येईल तो प्रत्येकाने स्वीकारण्याची तयारी का दिसत नाही? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. याबाबतचं ट्वीट सुप्रिया सुळे यांनी केलं आहे.
मंदिर-मसजिद विवाद सुप्रीम कोर्टात प्रलंबित असताना सरसंघचालक कायदा आणण्याची भाषा करतात, राज्यातील सत्ताधाऱ्यांचे भागीदारही त्याची री ओढतात. हा न्यायप्रक्रियेवर अविश्वास नाही का? जो काही निकाल येईल तो प्रत्येकाने स्वीकारण्याची तयारी का दिसत नाही?#जवाबदो@PMOIndia @CMOMaharashtra pic.twitter.com/valBALfMyU
— Supriya Sule (@supriya_sule) October 20, 2018
COMMENTS