राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार का?,  सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया !

राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार का?, सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया !

मुंबई – राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याची चर्चा सुरु होती. काल काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांची भेट घेतली. त्यामुळे राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार असं बोललं जात होतं. परंतु याबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचं पवारांनी स्पष्ट केलं. त्यानंतर आज राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.राष्ट्रवादीचं विलीन होण्याच्या अफवा आहेत. आमची अशी कोणतीही चर्चा झाली नाही. ही चर्चा फक्त माध्यमांमध्ये झाली असल्याचं सुळे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान लोकसभेत विरोधी पक्षनेते कसे मिळवता येईल याचीही चाचपणी सध्या सुरु आहे.लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारूण पराभव झाल्याने लोकसभेत विरोधी पक्षनेतेपद मिळण्याइतपतही काँग्रेसला जागा मिळालेल्या नाहीत. त्यामुळे राष्ट्रवादी पक्ष जर काँग्रेसमध्ये विलीन झाला तर काँग्रेसला विरोधीपक्ष नेतेपद मिळू शकते अशी चर्चा होती. परंतु राष्ट्रवादी पक्ष विलिनीकरणाबाबात कुठलीही चर्चा झाली नसल्याचं पवार यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आज सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादीचं विलीन होण्याच्या अफवा आहेत. आमची अशी कोणतीही चर्चा झाली नाही. ही चर्चा फक्त माध्यमांमध्ये झाली असल्याचं म्हटलं आहे.

COMMENTS