पार्थ पवार यांच्या उमेदवारीबाबत काय म्हणाल्या सुप्रिया सुळे ?

पार्थ पवार यांच्या उमेदवारीबाबत काय म्हणाल्या सुप्रिया सुळे ?

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना लोकसभेची उमेदवारी देण्याबाबत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पार्थ यांच्याबाबत मीडियामध्ये झालेला गैरसमज असून आमच्यापैकी त्याबाबत कोणच बोललेलं नसल्याचं सुळे यांनी म्हटलं आहे. तसेच अजितदादा एवढंच म्हणाले होते की त्यांची इच्छा नाही की त्यांच्या कुठल्या मुलाने निवडणूक लढवावी, पण प्रत्येकाला अधिकार आहे. अजितदादांचे हे वक्तव्य योग्य होतं, पार्थचीही इच्छा नाही. तसेच शरद पवार जी गोष्ट बोलले तेही महत्त्वाचे आहे, जो कार्यकर्ता आहे त्यालाही तिकीट मिळालं पाहिजे एका घरात किती पदं देणार तुम्ही असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान आगामी निवडणमुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला जागा वाढवून हव्या आहेत.  याबाबत काँग्रेसबरोहर अद्याप चर्चा झालेली नाही. परंतु लवकरच चर्चा करण्यात येणार असल्याचंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

तसेच संजय निरुपम यांनी उत्तर भारतीयांबाबत केलेल्या वक्तव्यावरही सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. निरुपम यांच्या वक्तव्याचे स्पष्टीकरण अशोक चव्हाण यांनी दिलं आहे. आज देशात ऐक्य ठेवणं महत्त्वाचं आहे. गुजरातमध्ये जी घटना झाली ती अतिशय धक्कादायक आहे. पोलीस, प्रशासन गुजरातमध्ये काय करतंय असा प्रश्न निर्माण झाला आहे.सो कॉल्ड गुजरात मॉडेल म्हणून देशात दाखवलं जातं तिथे जर अशा गोष्टी होत असतील आ़णि देशाचे ऐक्य धोक्यात येत असेल तर ही अतिशय गंभीर बाब असल्याचंही सुळे यांनी यावेळी म्हटलं आहे.

COMMENTS