पुणे – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू आणि पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य रोहित पवार हे विधानसभेच्या मैदानात उतरणार असल्याची चर्चा आहे.रोहित पवार यांनी देखील विधानसभेची निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे रोहित पवार हे कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची दाट शक्यता आहे. त्याबाबत खासदार सुप्रिया सुळेंनीही प्रतिक्रिया दिली आहे. कोणाला संधी द्यायची हा अधिकार माझ्याकडे नाही. रोहित फिल्डवर जाऊन लोकांमध्ये काम करत आहे. हे प्रशिक्षण त्यांना शरद पवारांकडून मिळतं असं त्यांनी म्हटलंं आहे.
दरम्यान रोहित पवार यांना संधी द्यावी की न द्यावी हे पक्ष ठरवेल. हा निर्णय मी किंवा रोहित घेऊ शकत नाही, असंही सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे. दरम्यान सुप्रिया सुळेंनी केलेल्या या वक्तव्यावरुन ते विधानसभा निवडणूक लढवतील अशी शक्या वर्तवली जात आहे.
COMMENTS