नवी मुंबई – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे काल श्रीरामपूर येथील पत्रकार परिषदेत संतापल्याचे पहावयास मिळाले. पत्रकार परिषदेत त्यांना सध्या पक्षातील अनेक नेते सोडून जात आहेत. यामध्ये तुमचे नातेवाईकही आहेत? असा सवाल एका पत्रकाराने केला. त्यावर पवार त्या पत्रकारावर भडकले. इथे नातेवाईकाचा काय संबंध येतो असं म्हणत त्यांनी त्याठिकाणाहून काढताय पाय घेण्याचा प्रयत्न केला परंतु यावेळी पवारांना इतर पत्रकारांनी थांबवले. शरद पवार यांच्या संतापावर त्यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
50 वर्षांत मी त्यांना कधी असं चिडलेलं पाहिलं नाही,कधीही न चिडणारा माणूस काल पहिल्यांदाच चिडलेला दिसला. मलाही आश्चर्य वाटलं. 50 ते 52 वर्षांत मी त्यांना कधी असं पाहिलेलं नाही. पण वडिलांच्या वयाच्या व्यक्तीला एकच प्रश्न पाचवेळा विचारल्यावर चीडचीड होऊ शकतो. शेवटी माणूस आहे. खरंतर आपल्या पिढीनं याबाबत आत्मचिंतन करायल पाहिजे अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली आहे.
COMMENTS