यवतमाळ – जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी लोकांनी आपल्याला लोकसभेत पाठविले असून, तिथुनच आपण आपले कार्य करणार असल्याचं वक्तव्य खासदार सुप्रिया सुळे यांनी उमरखेडमधील एका कार्यक्रमात केलं आहे. त्यांनी केलेल्या या सूचक विधानाने जणू अजितदादा पवार समर्थकांना दिलासा मिळाला असावा. गो. सी. गावंडे महाविद्यालयातील युवक युवती मेळाव्यात त्या बोल होत्या. या मेळाव्यात भाषण करण्याऐवजी सुप्रियाताईंनी थेट महाविदयालयीन विदलार्थीनी व विदयार्थ्यांशी संवाद साधला. या वेळी एका विदयार्थिनीने पुरोगामी महाराष्ट्रात अद्याप महिला मुख्यमंत्री का होवु शकली नाही?, तुम्ही मुख्यमंत्री होणार का? या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी वरील वक्तव्य केल आहे.
मुख्यमंत्री या पदाला स्त्री -पुरुष असा भेदभाव नसतो. ज्या राज्यात स्त्रिया मुख्यमंत्री झाल्या तेथील स्त्रीयांचे प्रश्न सुटलेत का ? असा प्रतिप्रश्न करित पुरोगामी महाराष्ट्रात स्त्रियांना राजकारणासह सर्व क्षेत्रात पुढे आणण्यासाठी पुरुषांनीच काम केलं असल्याचा आवर्जुन उल्लेख त्यांनी यावेळी केला. दरम्यान सुप्रिया ताईंनी केलेल्या अनेक राजकीय कोपरखळ्यांवर उपस्थितांनी चांगलीच हसहसून दाद दिली तथापी आपण केंद्रातच राहणार असा उल्लेख त्यांनी करताच, राज्यात निदान तरी अजीतदादांचीच चलती असणार हे स्पष्ट झाले आहे.
COMMENTS