पुणे – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ईडीकडून चौकशी सुरु आहे. याबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांची पाठराखण केली आहे. यावर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ईडीची चौकशी म्हणजे राजकीय दबाव तंत्र आहे. जो कोणी आवाज उचलतो त्याचा आवाज दडपण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. अशा काळात आपला परिवारच मागे उभा राहतो. त्यामुळे राज ठाकरे यांचा परिवार सोबत गेला तर कोणी टीका करू नये. बाळासाहेबांचे संस्कार अजूनही जीवंत आहेत यामुळेच उद्धव ठाकरेंनी भाऊ राज ठाकरेंची बाजू घेतली असल्याचं सुळे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी देखील आज राज ठाकरे यांच्या पाठिशी असल्याचं म्हटलं आहे. आम्ही राज यांच्या पाठिशी आहोत, हे बाळासाहेब ठाकरे यांचे संस्कार आहेत. राजकारणात विरोधात असलो तरी कुटुंब म्हणून आम्ही एक असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
तसेच काल उद्धव ठाकरे यांनी देखील राज यांची अप्रत्यक्षरित्या पाठराखण केली होती. ‘मला नाही वाटत की या चौकशीतून काहीही बाहेर येईल असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं. यावर सुप्रिया सुळे यांनी अशा काळात आपला परिवारच मागे उभा राहतो. त्यामुळे राज ठाकरे यांचा परिवार सोबत गेला तर कोणी टीका करू नये. बाळासाहेबांचे संस्कार अजूनही जीवंत आहेत यामुळेच उद्धव ठाकरेंनी भाऊ राज ठाकरेंची बाजू घेतली असल्याचं म्हटलं आहे.
COMMENTS