पुणे – शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनाही ट्यूशन लावण्याची गरज असल्याचं वक्तव्य राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं आहे. तावडे यांच्या बॉसलाच ट्युशन लावण्याची गरज आहे. त्यामुळे तावडे यांनादेखील शाळा बंद धोरणावर माजी शिक्षणसंचालक वसंत काळपांडे यांच्याकडे ट्युशन लावायला असं सुळे यांनी म्हटलं आहे. समायोजन आणि उत्तम शिक्षणासारखे शब्द वापरून राज्याचे शिक्षणमंत्री शब्दांचा खेळ करत आहेत, काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार आणि सुप्रिया सुळे खोट बोलत असल्याचा आरोप तावडेंनी केला होता. मात्र, हा आरोप म्हणजे स्वतःचे अपयश लपवण्याचा केविलवाणा प्रयत्न असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.
दरम्यान मी आणि पवारसाहेब कधी खोट बोललो हे तावडेंनी दाखवावे, असं आवाहन देखील सुप्रिया सुळे यांनी केलं आहे. एका बाजूला सरकार शाळा बंद करणार नसल्याचे सांगतं, मात्र दुसरीकडे गुणवत्ता आणि पटसंख्येचं कारण देत समायोजित करण्याचे सांगितले जाते. समायोजनामध्ये विद्यार्थ्यांना एका शाळेतून दुसऱ्या शाळेत पाठविणे म्हणजे शाळा बंद करणे असच होत असल्याचंही सुळे यांनी यावेळी म्हटलं आहे.
COMMENTS