नवी दिल्ली – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना संसदरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. राजभवन, चेन्नई येथे तामिळनाडूचे राज्यपाल श्री. बनवारीलाल पुरोहित यांच्या हस्ते त्यांना संसदरत्न पुरस्कार देण्यात आला. प्राईम पॉईंट फाऊंडेशन-प्रिसेन्स ई मॅगेझिन यांच्यावतीने हा पुरस्कार देण्यात आला आहे. हा पुरस्कार स्वीकारताना विशेष आनंद होत असल्याचं यावेळी सुप्रिया सुळे योंनी म्हटलं आहे.
जनतेने दाखविलेला विश्वास आणि आशीर्वादाच्या बळावर संसदेत जनतेसाठी काम करण्याची संधी मिळाली. हा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी मी सदैव प्रयत्नरत आहे. हा संसदरत्न पुरस्कार माझा बारामती लोकसभा मतदारसंघ आणि महाराष्ट्रातील तमाम जनतेचा गौरव आहे. या जनतेलाच मी हा पुरस्कार समर्पित करीत आहे. pic.twitter.com/5opm7N0jQO
— Supriya Sule (@supriya_sule) January 19, 2019
दरम्यान जनतेने दाखविलेला विश्वास आणि आशीर्वादाच्या बळावर संसदेत जनतेसाठी काम करण्याची संधी मिळाली. हा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी मी सदैव प्रयत्नरत आहे. हा संसदरत्न पुरस्कार माझा बारामती लोकसभा मतदारसंघ आणि महाराष्ट्रातील तमाम जनतेचा गौरव आहे. या जनतेलाच मी हा पुरस्कार समर्पित करीत असल्याचंही यावेळी सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
COMMENTS