सुप्रिया सुळेंचा ‘सेल्फी विथ खड्डा’, चंद्रकांत पाटील यांचे जोरदार प्रत्युत्तर

सुप्रिया सुळेंचा ‘सेल्फी विथ खड्डा’, चंद्रकांत पाटील यांचे जोरदार प्रत्युत्तर

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या खड्डयांसोबत सेल्फी काढल्याच्यावरून राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री तथा जळगावचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सुप्रिया सुळेंना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. 

‘सुप्रिया सुळे सत्तेत नसल्याने त्यांना काही कामाच उरलेलं नाही.’ असं चंद्रकांत पाटलांनी म्हटलं आहे. ‘सुप्रिया सुळेंनी त्यांचे वडील आणि भावाला विचारावे की राज्यातील रस्त्यांवर त्यांनी 1200 ते 1500 कोटी रुपयांच्यावर कधी तरतुदच केली नाही. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम खात्याचं बजेट खड्डे भरण्यातच संपतं.’ असं स्पष्टीकरण चंद्रकांत पाटलांनी दिलयं.

काही दिवसांपूर्वी सुप्रिया सुळे यांनी कात्रज-उंड्री बायपास आणि बोपदेव घाटातील रस्त्यावरील खड्ड्यांसोबतचे सेल्फी ट्विटरवरुन शेअर केले होते.  या ट्वीटमध्ये त्यांनी राज्याचे महसूल मंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाना साधाला होता, यावर आज चंद्रकांत पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं.

COMMENTS