मुंबई – ‘शिवसेनेने सत्तेत रहावं किंवा विरोधात, मात्र दोन्ही दगडावर पाय ठेवू नये.’ अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.
‘भाजपकडून शिवसेनेला काडीचीही किंमत नाही. सरकारमध्ये शिवसेना एवढी दुर्लक्षित आहे कि, लाभार्थीच्या जाहिरातीतही त्यांना स्थान नाही.’ असा टोलाही त्यांनी शिवसेनेला लगावला.
हार्दिक पटेलच्या कथित सेक्स सीडीबाबत सुप्रिया सुळे म्हणाल्या की, ‘भाजपने राजकारणाची राजकारणात खालची पातळी गाठली आहे. कुणाच्याही वैयक्तिक आयुष्यात डोकावण्याचा कोणालाही अधिकार नाही.’
COMMENTS