स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला राष्ट्रवादीचा पाठिंबा –सुप्रिया सुळे

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला राष्ट्रवादीचा पाठिंबा –सुप्रिया सुळे

पुणे –  सातत्याने दुधाच्या दरात घसरण होत असल्यामुळे अनेक शेतकरी संघटनांची आंदोलनं महाराष्ट्रभर सुरू आहेत. त्यातच आता येणाऱ्या 16 तारखेपासून स्वाभिमानी शेतकरी संघटना दूध दरवाढीसाठी तीव्र आंदोलन करणार आहे. या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेसनं देखील पाठिंबा दर्शवला असून याबाबतची घोषणा खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. 16 जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पुण्यामध्ये दूध दरवाढीसाठी तीव्र आंदोलन करणार असल्याचं सुळे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान खासदार सुप्रिया सुळे यांनी आज बारामती तालुक्यातील गुणवडी येथे गाव भेट दौरा आयोजित केला होता. त्यावेळी त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. पुणे जिल्ह्याचा विकास मोठ्याप्रमाणावर झाला आहे. त्याचे कारण इथून मागच्या काळात निधी मोठ्याप्रमाणात मिळत होता. त्यामुळे विकास ही चांगला झाला मात्र आताच्या पालकमंत्र्यांकडून निधी मिळत नसल्याची खंतही यावेळी सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली आहे.

COMMENTS