सुप्रिया सुळे आणि अजित दादा यांच्या नात्याबद्दल काय म्हणाल्या पंकजा मुंडे ?

सुप्रिया सुळे आणि अजित दादा यांच्या नात्याबद्दल काय म्हणाल्या पंकजा मुंडे ?

पुणे – पंकजा मुंडे आणि त्यांचे चुलत भाऊ धनंजय मुंडे यांच्यात सध्या सुरू असलेला वाद महाराष्ट्राला सर्वश्रूत आहे. दोघेही एकमेकांना राजकारणात कोंडीत पकडण्याची एकही संधी सोडत नाहीत. एकमेकांवर राजकीय टीका टिपण्णी करण्यात एकही संधी न सोडणारे मुंडे भाऊ बहिण हे आपल्या नात्याविषयी फारसे बोलताना  दिसत नाहीत. मात्र काल पुण्यात पंकजा मुंडे नात्याबद्दल बोलताना काहीशा भावूक झाल्या….  आमच्या भावा बहिणीचा जसा वाद झाला आणि त्याच्यातून आमची ताटातूट झाली तशी परिस्थिती अजित दादा आणि सुप्रिया सुळे यांच्यावर येऊ नये असे उद्गार पंकजा यांनी काढले. हे सांगतानाही त्या भावूक झाल्या होत्या. पुण्यात आयोजित एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

COMMENTS