बीड – विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांना जगमित्र नागा सूतगिरणी प्रकरणी तारण असणाऱ्या मालमत्ता विक्री अथवा खरेदी करता येणार नसल्याचा आदेश अंबाजोगाई सत्र न्यायालयाने काल दिला. त्यानंतर मुंडे यांनी आपल्यावर सुडबुद्धीने कारवाई केली जात असल्याचा आरोप केला. याबाबत आज धनंजय मुंडे यांच्यावर विधानपरिषदेचे आमदार सुरेश धस यांनी टीका केली आहे.
दरम्यान विरोधी पक्ष नेते या घटनात्मक पदावर असलेल्या धनंजय मुंडे यांनी तात्काळ पदाचा राजीनामा द्यावा तसेच शेतक-यांचे कैवारी असलेले शरद पवार यांनी मुंडे यांच्या हातात नारळ द्यावा अशी मागणी सुरेश धस यांनी केली आहे. तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सरकार असतानाच गुन्हे दाखल झाले आहेत. तेव्हाच्या आणि आताच्या गृहमंत्र्यांचा त्याच्य़ाशी काहीही संबंध नसल्याचं सुरेश धस यांनी म्हटलं आहे.
COMMENTS