पुणे – सोलापूरमधील भाजपचे खासदार शरद बनसोडे आणि काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्यातील वादावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशिलकुमार शिंदे यांनी वक्तव्य केलं आहे. प्रणिती चुकून बोलली असून खासदार शरद बनसोडे यांच्याबद्दल प्रणितीला आणि मलादेखील आदर आहे. त्यांच्याविषयी आमच्या मनात कोणतीही वाईट भावना नाही. ते आमचे आहेत. प्रणिती चुकून बोलली आणि वर्तमानपत्रांनी तेच वाक्य घेतलं असल्याचं स्पष्टीकरण सुशिलकुमार शिंदे यांनी दिलं आहे. पुण्यातील एका कार्यक्रमात ते बोलत होते.
दरम्यानन काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी जाहीर कार्यक्रमात खासदार शरद सोनवणे यांचा बेवडा असा उल्लेख केला होता. त्यामुळे शरद बनसोडे आणि प्रणिती शिंदेंमध्ये वाद पेटला होता. पुन्हा असं वक्तव्य केलं तर सोलापुरात फिरू देणार नाही असा दम शरद बनसोडे यांनी दिला होता. त्यानंतर या वादावर अखेर सुशिलकुमार शिंदे यांनी स्पष्टीकरण दिलं असून प्रणिती चुकून बोलली असल्याची सफाई शिंदे यांनी दिली आहे.
COMMENTS