सोलापूर – पंढरपूरजवळील भाळवणी येथे आज शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. या मेळाव्याला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे एकत्र आले आहेत.यावेळी आम्ही सत्ते असू किंवा नसू लोककल्याणासाठी एकत्र येतो असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.दरम्यान यावेळी शरद पवार यांनी सरकारवर जोरदार टीका केली असून अर्थव्यवस्था सुधरायची असेल तर शेती उद्योग सुधारावे लागणार आहेत. परंतु शेती मालाची किंमत वाढवायची म्हटले तर सत्ताधा-यांच्या पोटात गोळा उठतो अशी जोरदार टीका पवार यांनी केली आहे.
तसेच हे सरकार लबाडाचे औतन असून मंत्रालयासमोर अत्महत्या म्हणजे शेतक-यांना मदत अशीच काहीची परिस्थिती सध्या झाली असल्याचंही पवार यांनी म्हटलं आहे. तरतूद न करता शेतमाल खरेदी कसा करणार तसेच पुढच्या वर्षी ऊस जास्त आहे त्यामुळे लवकर कारखाने चालू करण्याची मागणीही पवार यांनी केली आहे. तसेच मोदी नावाच्या माणसांनी देशाला छळलं असून कर्जमाफीची घोषणा केली कर्जमुक्ती झाली नसल्याचा आरोपही पवार यांनी केला आहे.
COMMENTS