सोलापूर – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशिलकुमार शिंदे यांना शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांनी सल्ला दिला आहे. काँग्रेसमध्ये सुरु असलेल्या घडामोडी आणि वादात सुशिलकुमार शिंदे यांनी लक्ष घालावे असं शिवसेनेचे जिल्हाप्रमुख् महेश कोठे यांनी सल्ला दिला आहे. सोलापूर काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी आमदार प्रणिती शिंदे यांच्या त्रासाला कंटाळून राजीनामा दिला असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर आपण स्वतः या राजकारणाकडे लक्ष घालावं असं महेश कोठे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान काँग्रेसचा एक गट वरिष्ठांचा गैरसमज करत असल्याचं कोठे यांनी म्हटलं आहे. एखाद्या ऐकीव माहितीवर तातडीने निर्णय घेण्याऐवजी माहितीची खात्री करून निर्णय घेतला तर ते काँग्रेसच्या फायद्याचे ठरणार असून सध्या काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या घटनांवर लक्ष घालावं असं कोठे यांनी म्हटलं आहे.
COMMENTS