नवी दिल्ली – भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचं आज निधन झालं आहे. दिल्लीच्या एम्स रुग्णालयात सुषमा स्वराज यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार स्वराज यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालं आहे. स्वराज यांना आज छातीत दुखण्याचा त्रास सुरु झाल्यामुळे त्यांना त्वरित एम्समध्ये नेण्यात आलं होतं. परंतु उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं असल्याची माहिती आहे. दरम्यान सुषमा स्वराज यांच्या प्रकृतीबाबत माहिती मिळताच केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे एम्समध्ये दाखल झाले होते.
काही तासांपूर्वीच सुषमा स्वराज यांनी जम्मू-काश्मीरवर मोदी सरकारच्या निर्णयाचं कौतुक केलं होतं. त्यांनी ट्वीट करत सरकारचं अभिनंदन केलं. ”पंतप्रधान मोदीजी तुमचं खूप खूप अभिनंदन. मी माझ्या आयुष्यात हा दिवस पाहाण्याच्या प्रतिक्षेत होती”, असं ट्वीट त्यांनी केलं होतं. त्यामुळे स्वराज यांचं हे अखेरचं ट्वीट ठरलं आहे.
शhttps://twitter.com/SushmaSwaraj/status/1158737840752037889?s=19
शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
सुषमा स्वराज यांचे निधन धक्कादायक आहे. त्या मला शरद भाऊ असं संबोधायच्या. संसदीय सहकारी म्हणून त्यांची कारकीर्द पाहता आली. त्या उत्तम वक्त्या, कुशल प्रशासक आणि सहृदय व्यक्ती होत्या. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
Shocked to hear about the sad demise of Sushmaji Swaraj. She would always call me ‘Sharad Bhau‘. We’ve lost a great statesman, eloquent orator, efficient administrator, fellow parliamentarian and above all a kind hearted person.
— Sharad Pawar (@PawarSpeaks) August 6, 2019
COMMENTS