अहमदनगर – महापालिकेतील महापौरपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नगरसेवकांनी भाजपला पाठिंबा दिला. राष्ट्रवादीच्या नगरसेवकांबरोबरच बहुजन समाज पार्टीच्या (बसपा) नगरसेवकांनीही भाजपला पाठिंबा दिला होता. त्यामुळे या नगरसेवकांच्या अडचणीत आता वाढ झाली असल्याचं दिसत असून भाजपला पाठिंबा दिल्यामुळे ४ नगरसेवकांचे निलंबन करण्यात आलं आहे. पक्षशिस्तीचा भंग केल्याच्या कारणावरुन त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
दरम्यान या निवडणुकीत पहिल्यांदाच बसपाने आपले उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उभे केले होते. या निवडणुकीत चार उमेदवारही निवडून आले. परंतु पक्षाची परवानगी न घेतला या चारही नगरसेवकांनी भाजपला पाठिंबा दर्शवला. त्यामुळे या नगरसेवकांचं आता पक्षश्रेष्ठींकडून निलंबन करण्यात आलं आहे. पक्षाकडून कोणताही आदेश नसताना बसपाच्या ४ नगरसेवकांनी पक्षशिस्तीचा भंग करीत भाजपाला पाठिंबा दिला त्यामुळे या नगरसेवकांवर कारवाई करण्यात आली असल्याचं बसपाचे प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे यांनी म्हटले आहे.
COMMENTS