जनावरांसोबत महामार्ग रोखण्याचा राजू शेट्टींचा इशारा !

जनावरांसोबत महामार्ग रोखण्याचा राजू शेट्टींचा इशारा !

मुंबई – दुधाला ५ रूपये दरवाढ मिळावी यासाठी ‘स्वाभिमानी’ने सुरू केलेल्या आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस आहे. राज्यात विविध ठिकाणी आंदोलक दुधाचे टँकर फोडत असून दूध, दुधाच्या पिशव्या रस्त्यावर ओतून देत आहेत. परंतु या आंदोलनाबाबत सरकारनं अजून दखल घेतली नसल्यामुळे हे आंदोलन आता आणखी चिघळणार असल्याचं दिसत आहे. सरकार आंदोलन दडपून टाकण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केला आहे. तसेच आता निर्णयाची वेळ आली असून शेतकरी आंदोलक जनावरांसोबत महामार्ग रोखणार असल्याचं राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे. त्यामुळे हे आंदोलन आता आणखी चिघळणार असल्याचं दिसत आहे.

दरम्यान विविध भागातून पोलीस संरक्षणात दूधाचे टँकर पुण्या-मुंबईकडे पाठवले जात आहेत. १० हजार लिटर क्षमतेच्या टँकरमध्ये २ हजार लिटर दूध पोलीसच घेऊन जात असल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केला आहे. तसेच मी आडमुठी भूमिका घेण्याचा प्रश्नच नाही. सरकार दुट्टप्पी भूमिका घेत आहे. मला त्यांनी कुठल्याही चर्चेसाठी बोलावलेले नाही. त्यांनी कुठे बोलावले होते हे एकदा जाहीर करावे, असेही ते म्हणाले. हे सरकार खासगी कंपन्यांच्या फायद्यासाठी काम करत असून या लोकांना सरकारची तिजोरी लुटायची असल्याचा आरोपही यावेळी राजू शेट्टी यांनी केला आहे.

 

COMMENTS