कोल्हापूर – नवी दिल्ली येथील शेतकरी आंदोलनासाठी सोडण्यात आलेली खास रेल्वेची स्वाभिमानी एक्सप्रेस परतीच्या मार्गावर भरकटली. नियोजित मार्गाऐवजी भलत्याच मार्गावर रेल्वे गेल्याने रेल्वेचा गलथानपणा समोर आला. सकाळी ही बाब लक्षात येताच शेतकऱ्यांनी हाताला येईल, त्या वस्तुंची फेकाफेकी करून निषेध व्यक्त केला. रेल्वेसमोर आडवे होऊन संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
दिल्ली येथे देशभरातील शेतकऱ्यांचे आंदोलन झाले. यासाठी खास रेल्वे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पुढाकाराने गेली होती. येताना मथुरा कोटाटा मार्गे कल्याण तेथून पुणे असा मार्ग होता. मध्यरात्री मथुरेतून रेल्वे भरकटली. ती परत आग्राच्या दिशेने गेली. पहाटे 4 वाजता चहासाठी आचाऱ्याने स्टेशन कोणते आहे हे पाहिल्यानंतर चुकीच्या सिग्नलमुळे रेल्वे 160 किलोमीटर मार्ग बदलून आल्याचे लक्षात आले. शेतकऱ्यांनी स्टेशन मास्टरला विचारताच तुम्ही इकडे कुठे आलात, असा उलटा प्रश्न शेतकऱ्यांना विचारला. रेल्वे काय आम्ही चालवतोय काय? असे सांगत शेतकऱ्यांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. त्यानंतर तब्बल दोन तास गोंधळ झाल्यानंतर गाडी झाशीकडे रवाना झाली. खासदार राजू शेट्टी यांनी याबाबत रेल्वे मंत्रालयाकडे तक्रार केली आहे.
COMMENTS