कोल्हापूर – स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांना आणखी एक धक्का बसला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे निष्ठावंत आणि जिल्हाध्यक्ष भगवान काटे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भगवान काटे यांचा महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश झाला आहे. भगवान काटे हे राजू शेट्टी यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जात होते.
काही दिवसांपूर्वीच स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी भाजपात प्रवेश केला. लोकसभा निवडणुकीत रविकांत तुपकर यांना आघाडीच्या जागावाटपामुळे इच्छा असूनही लढण्याची संधी मिळाली नाही. त्यानंतर त्यांना विधानसभेचं आश्वासन दिल्याचं बोललं गेलं. मात्र त्यांना कोणताही मतदारसंघ सोडला जात नसल्याने ते नाराज होते. त्यामुळेच तुपकर यांनी भाजपात प्रवेश केला होता. त्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे निष्ठावंत आणि जिल्हाध्यक्ष भगवान काटे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे..
दरम्यान यापूर्वी सदाभाऊ खोत हे भाजपसोबत गेल्यामुळे शेट्टी यांना मोठा धक्का बसला होता. त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर रविकांत तुपकर, भगवान काटे यांनी राजू शेट्टींची साथ सोडली.
COMMENTS