तारिक अन्वर पुन्हा काँग्रेसमध्ये, ‘या’ मतदारसंघातून दिली जाणार उमेदवारी ?

तारिक अन्वर पुन्हा काँग्रेसमध्ये, ‘या’ मतदारसंघातून दिली जाणार उमेदवारी ?

नवी दिल्ली – तारिक अन्वर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला सोडचिठ्ठी दिल्यानंतर ते कोणत्या पक्षात प्रवेश करणार याबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात होते. परंतु अन्वर हे पुन्हा काँग्रेसमध्ये घरवापसी करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.येत्या काही दिवसांमध्ये ते सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट घेण्याची शक्यताही सूत्रांनी व्यक्त केली आहे. अन्वर यांच्या निर्णयाचं बिहारमधल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी स्वागत केलं आहे. त्यामुळे 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना काँग्रेसची उमेदवारीही दिली जाणार असल्याची शक्यता व्यक्त वर्तवली जात आहे.

दरम्यान तारिक अन्वर यांचं काँग्रेससोबत जुनं नातं असून 1976 मध्ये ते बिहार युवक काँग्रेसचे अध्यक्षही होते. तर बिहारमधल्याच कटिहार या लोकसभा मतदार संघातून ते पाचवेळा खासदारही होते. 1980 मध्ये पहिल्यांदा या मतदार संघातून ते निवडून आले होते. त्यामुळे आगामी निवडणुकीत त्यांना या मतदारसंघातूनच उमेदवारी दिली जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर तारिक अन्वर हे मुळचे काँग्रेसचेच नेते असून, त्यांचा पक्षावर अधिकार असल्याचं मत बिहार काँग्रेसचे नेते प्रेमचंद मिश्रा यांनी व्यक्त केलं आहे. त्यामुळे काँग्रेसला बिहारमध्ये चेहेरा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

COMMENTS