तारिक अन्वर यांना पक्ष सोडायचाच होता, फक्त कारण हवं होतं ?

तारिक अन्वर यांना पक्ष सोडायचाच होता, फक्त कारण हवं होतं ?

राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक सदस्य, पक्षाचे सरचिटणीस आणि लोकसभेतील गटनेते तारिक अन्वर यांनी तडकाफडकी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. खासदारकीचा आणि पक्ष सदस्यत्वाचा त्यांनी राजीनामा दिला आहे. त्यासाठी त्यांनी कारण सांगितलं आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी राफेल प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना क्लिन चिट दिली. राहुल गांधी आणि सर्वच विरोधक राफेल प्रकरणावरुन मोदींना घेरण्याचा प्रयत्न करत असताना पवारांनी केलेलं वक्तव्याचा भाजप आणि मोदी राजकीय फायदा उठवतील हे जरी खरं असलं तरी पवारांनी या प्रकरणावरुन मोदी किंवा भाजपला क्लिनचिट दिली असा होत नाही. किंवा पवारांनी मोदींची बाजू घेतली असाही होत नाही. त्याचं कारण पवारांनी जेपीसी मार्फेत याची चौकशी व्हावी अशी मागणी कायम ठेवली आहे.

शरद पवारांच्या मुलाखतीनंतर ही बातमी राष्ट्रीय बातमी झाली हे खरे. पण त्यांनी यावरुन पवारांना काहीही विचारले नाही. किंवा पक्षाच्या कोणत्याही वरिष्ठ नेत्याशी ते बोलले नाही. थेट त्यांनी माध्यमातील बातम्यांवरुन राजीनामा दिला. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणज्ये विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला राज्यात बिनशर्त पाठिंबा जाहीर केला होता. तेंव्हा तारिक अन्वर एका चकार शब्दाने बोलल्याचे आठवत नाही. जर जाहीर पाठिंबा देऊ केला असताना ते काही बोलले नाहीत मग आताच पवारांच्या या मुलाखतीवरु पक्षातील नेत्यांकडून खातरजमा न करता त्यांनी कसा काय राजीनामा दिला असा प्रश्न उपस्थित होतो.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राहून फारसं आपल्या हाती काही लागणार नाही अशी त्यांची खात्री झाली असावी. लोकसभेनंतर केंद्रात युपीएचं सरकार आलं तर पवार जरी मंत्री झाले नाहीत तरी प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे हे मुख्य दावेदार आहेत. त्यामुळे आपल्याला महत्वाचं मंत्रीपद मिळेल की नाही याचीही चिंता त्यांना असण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अन्वर लवकरच काँग्रेसमध्ये जाणार अशी शक्यता वर्तविली जात आहे. बिहारमध्ये काँग्रेसला चांगला चेहरा नाही. त्यामुळे काँग्रेसमध्ये त्यांचं स्वागतच होऊ शकेल. आणि त्यांनाही काँग्रेसमध्ये अधिक चांगलं राजकीय भवितव्य चांगलं वाटू शकेल. तसंचही सोनिया गांधी यांच्या परदेशी पणाचा मुद्दा आता बाद झाला आहे. सर्व सूत्र राहुल गांधी यांच्या खांद्यावर आली आहेत.

COMMENTS